नमस्कार,
महाराष्ट्र राज्याला थोर संत परंपरा लाभलेली आहे. या संत परंपरेतून भक्ती मार्ग आणि अखंड नामस्मरण यांचे अनोन्य साधारण महत्व त्यांनी लिहून ठेवलेल्या साहित्यातून कळून येते. कलीयुगात भगवंत आणि मोक्ष प्राप्तीचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण हाच आहे.
नामस्मरण हे कधीही, कसेही करता येते, तरी जर साधकाने एका शांत ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने नामस्मरण केल्यास त्याचा परिणाम हा जास्त प्रभावी असतो. असेच एक स्थळ म्हणजे श्री शंकर महाराज मंदिर (कृपाधाम), टिटवाळा. जे महाराष्ट्रातील थोर संत श्री शंकर महाराज यांच्या कृपेने घडून आले.
श्री शंकरनाथ सेवा मंडळ, (गोरक्षनाथ आखाडा) ची स्थापना दि. ३१/०३/१९९३ रोजी झाली आणि त्याची नोंदणी धर्मादाय आयुक्त ठाणे येथे झाली.
ट्रस्ट ई १३३१ दि. ३१/०३/१९९३ रोजी नोंदणीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. आमच्या संस्थेचा उद्देश एवढाच की श्री शंकर महाराजांचे विचार सर्व भक्तांपर्यंत पोहोचावेत आणि त्यासाठी श्री शंकर महाराजांचे भव्य दिव्य मंदिर उभारून त्याद्वारे महाराजांचे आध्यात्मिक विचारांचा प्रसार व्हावा. त्यासाठी सर्वप्रथम ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील श्री क्षेत्र महागणपती टिटवाळा येथील श्री शंकर महाराज मंदिरासाठी म्हसकळपाडा अंतर्गत काळू नदीकाठा जवळ दोन एकर जागा खरेदी करण्यात आली, त्यानंतर टप्प्याटप्प्याने मंदिराचे बांधकाम करण्यात आले आणि दि. २७/०४/२००० रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिवशी, श्री शंकर महाराजांच्या पंचधातु मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आदरणीय सुरेश तांबट यांच्या शुभ हस्ते करण्यात आली. मंदिर परिसरात श्री स्वामी समर्थ, श्री हनुमान व श्री साईबाबा यांच्या मूर्तींची सुद्धा स्थापना करण्यात आल्या आहेत. सदरहू मंदिराला महाराष्ट्र शासन ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे.
यज्ञशाळा, ध्यानमंदिर, अन्नपूर्णा, भक्तीनिवास अशी अध्यात्मिक बांधकामे झाली आहेत. मंदिर परिसरात विविध फुलझाडे, फळझाडे आणि हिरवळ मुबलक असून मंदिराजवळील सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून ५० एकर परिसरात २१ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यात श्री शंकरनाथ सेवा मंडळाचा मोठा सहभाग आहे. जवळच काळू नदी आहे जी बारा महिने पाण्याने भरलेली असते. महाराजांचे कृपाधाम हे अतिशय भव्य स्वरुपात अतिशय निसर्गरम्य आणि भक्तिमय परिसरात वसलेले आहे.
श्री शंकरनाथ सेवा मंडळ शेतकरी कृषी मेळावे, वैद्यकीय शिबिरे, गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेशाचे वाटप करते. वसई, कल्याण, शहापूर, मुरबाड या तालुक्यांतील शाळा आणि रुग्णालयांमध्ये शुद्ध पाण्यासाठी वॉटर फिल्टरचे वाटप करण्यात आले आहे.
श्री शंकरनाथ सेवा मंडळ (गोरक्षनाथ आखाडा) टिटवाळा, या संस्थेला चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंतीला दि. ३१/०३/२०१८ रोजी २५ वर्षे पूर्ण झाल्याने रौप्यमहोत्सवी विशेषांक प्रकाशित केला आहे. श्री शंकर महाराजांचे कार्य, त्यांचे अध्यात्मिक विचार पंचक्रोशीतील भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा संस्थेने संकल्प केला आहे. श्री शंकर महाराजांच्या भक्तांच्या अनुभवांचे लेख या विशेषांकात प्रसिद्ध केले आहेत.
|| जय शंकर ||
श्री शंकर महाराजांच्या मंदिराची पायाभरणी १९९५ साली करण्यात आली, त्यानुसार सर्व साधकांनी श्रीं ची मूर्ती व मारुती यांची मूर्ती मुंबईचे प्रसिद्ध शिल्पकार श्री. तालीम यांच्याकडुन आणण्याचे निश्चित केले. सेवकांचा हाती कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध नसताना महाराजांनी सदर संकल्प पूर्ण करुन घेतला. श्रींचीमूर्ती टिटवाळा येथील गणपती मंदिरात दर्शन घेऊन रुंदा पूलाजवळील स्वतःच्या वास्तूत अक्षय तृतीया सन २००० साली स्थानापन्न झाली.
शंकर गीता - अध्याय २
जय जय महाराज श्री शंकर । भक्तांना जे कल्याणकर स्मरता होती सुखकर। नमन त्यांना असो हे || १ ||
'शं' म्हणजे कल्याण तर । कर म्हणजे जो करणार कल्याण करी जो खरोखर । शंकर त्यांना म्हणतात || २ ||
शंकर गीता - अध्याय १७
महाराज दिसले मारुतिराय। जो तो धरी त्यांचे पाय
आज आमची गेली माय। कळवळा फुटला सर्वांना
|| ६६ ||
तेवढ्यात माळीमहाराज आले त्यांनी अंत्यदर्शन घेतले |
महाराज बजरंगबलीच दिसले माळी महाराज म्हणाले
|| ६७ ||
आपण बजरंगबलीचे रूप घेतले भक्तीचे मार्ग वेगवेगळे
जगाला सांगण्यासाठी सगळे म्हणून असे बनला का ?
|| ६८ ||
महाराज भक्तांस नेहमी म्हणती मी प्रत्यक्ष आहे मारुती
मारुतीच्या रुपात दर्शन देती। आपल्या अनेक भक्तांस
|| ६९ ||
महाराजांचे हे वचन मारुती रुपात झालेले दर्शन यावेळी सर्वास आठवून हृदय आले भरून
|| ७० ||
प्रातःस्मरणीय चिरंजीव सप्त । त्यात मारुतीराय प्रख्यात म्हणून मी चिरंजीव असत हेच महाराज सुचवित
|| ७१ ||
निर्गुण निराकाराची उपासना करण्यासाठी श्री शंकर महाराजांनी ज्ञानेश्वरी व दासबोधाचे आचरण करावे तसे आचरण केल्यास षट्चक्र ध्यानातून स्वतःची ओळख व स्वतःचा उद्धार करावा. कृपार्शिवादाने त्यांच्या व उक्ती प्रमाणे त्यांना जसे पाहीजे होते तसे ३६ फुट उंच श्री यंत्रात हे ध्यानकेंद्र (Pyramid) उभारले गेले.
मनःशांती मिळविण्यासाठी स्फटीकाची ध्यानमूर्ती स्थापन केली असून सुंदर असे मनाला शांती व एकाग्रता देणारे ध्यानकेंद्र कार्यरत आहे, या स्फटिकाच्या (Crystal) मूर्तीमध्ये सप्तचक्रे आहते ते विद्युत रोषणाईने चमकतात व त्यावर ध्यान करता येते. हे एक नाथपंथीय ध्यान असून त्यास 'षट्चक्र भेदन' ध्यान असे म्हणतात. तेथे बसून श्लोक, मंत्रोच्चार करुन ध्यान केंद्रित केल्यास श्रध्दावान भक्ताला फारच मोठा सुखद आल्हाददायक
असा अनुभव मिळतो.
शंकर गीता - अध्याय १२
आत्मसाक्षात्काराकरता ।
शाख, गुरुपासून आत्मा अनारमा
यांचे स्वरूप समजावून घेण्याला ज्ञान ऐसे म्हणतात
|| ८९ ||
अष्टांगांच्या अभ्यासाने । चित्ताचा निरोध करणे प्रयत्नपूर्वक हे आचरणे । योग याला म्हणतात
|| ९० ||
अज्ञानाने देह आत्मा या दोघांच्या ।अन्योन्याभ्यासात ये उदयाला
हात घालून वेगळे करतो दोघांना । विवेक त्याला म्हणतात || ९१ ||
असा विवेक जागा रहावा सदैव । मी शरीर नसून आत्मा असत असणे असा विचार अंतःकरणात। यालाच तप असे म्हणतात
|| ९२ ||
दुःखिताला होणारे दुःख । कारुण्याने नाहीसे असता करत
सुष्ट दुष्ट हा न करण भेद । दया याला म्हणतात
|| ९३ ||
कर्मेद्रियाचे व्यवहार। बंद पडतात प्राण जिंकल्यावर
बंद होतात ज्ञानेंद्रिये व्यवहार। मनोनिग्रह केल्याने
||९४ ||
सर्व ओझे सहन करीत असताना। सहन करण्याच्या अभिमानाला मुळीच स्पर्श न होणे याला। क्षमा ऐसे म्हणतात
|| ९५ ||
दुसऱ्यास क्षमा केली तर। आतून आनंद राशि प्रगटतात
क्षमेचा निर्भेळ हा आनंद। चिरकाल असतो टिकणारा
|| ९६ ||
आध्यात्मिक आधिभौतिक ।
आधिदैविक संकटे आकस्मित
येता धारक शक्तीने जे पचवित। धैर्य त्याला म्हणतात
|| ९७ ||
निष्काम धर्माचा आचार। अंतरी आत्मानात्म विचार
अंगी मुरलेत खरोखर। शौच याला म्हणतात
|| ९८ ||
साधण्यासाठी स्वतःचे हित। इतरांचे न करणे मुळीच अहित न करणे प्रयत्न नि कलुषित । याला अद्रोह म्हणतात
|| ९९ ||
ध्यान आणि योग शिबिरासाठी भक्त निवासाची सोय
१९९५ साली दत्त जयंतीच्या दोन दिवस पूर्वी श्री. गणेश याग, दत्त याग केला व त्र्यंबकेश्वर चे अकरा गुरुजी येथे आले आणि त्यांनी पौरोहित्य केल्यामुळे सात दिवसांचा कार्यक्रम पार पडला. महाराजांनी १९९७-९८ या कालावधीत श्री स्वामी समर्थांचे मंदिर बांधून घेतले, त्यावेळी महामृत्युंजयचे एक लाख जप करण्यात आले. म्हणजेच महाराजांनी प्रथम आपल्या गुरूंचे मंदिर बांधुन कार्यारंभ केला. सदर मूर्ती कल्याण येथील शिल्पकार श्री. साठे यांच्याकडुन करुन घेण्यात आली
शंकर गीता - अध्याय २
अक्कलकोट स्वामी समर्थ । त्यांच्या समाधी मठात
येऊन सारे वंदन करत। शंकर महाराज म्हणाले || १७ ||
'हेच माझे सद्गुरु असत'। ऐसे म्हणून माथा टेकवित
गुरु-शिष्यांची भेट होत। अपूर्व हा सोहळा || १८ ||
शंकर गीता - अध्याय ४
पुढे पुण्याहून गेले नगरला । तेथून पुण्यक्षेत्र मढीला
नाथांच्या पुण्यसमाधीला । वंदन केले सर्वांनी
|| ४३ ||
कित्येक वर्षांची धुनी शांत। महाराज जेव्हा अल्लख म्हणत
तेव्हा आपोआप धुनी पेटत । चकित झाले सर्वही
|| ४४ ||
प्रज्वलित केली तेथली धुनी। साधनेचे महत्त्व पटवूनी
उत्तम प्रथा आचराव्या म्हणूनी । महाराज सर्वां सांगत
|| ४५ ||
२००५ च्या कालावधीत 'श्री शिर्डीचे साईबाबा' यांचे आगमन झाले. सदर कार्यात सर्व भक्तगणांचे मोलाचे सहाय्य लाभले व त्यामुळेच साईबाबांचे मंदिर होऊ शकले.
संत श्री गुलाबबाबा चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांनी सदर
अन्नपूर्णा भवनाचे काम पूर्ण केले आहे.
॥ जय गुलाबबाबा ॥
दिनांक - २३/०७/२०२१.
सचिव आणि संस्थापक सदस्य
कार्याध्यक्ष
कोषाध्यक्ष
विश्वस्त
विश्वस्त
विश्वस्त
विश्वस्त
विश्वस्त
विश्वस्त
विश्वस्त
विश्वस्त
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.
कृपया संपूर्ण मजकूर देणगी विभागात वाचावा आणि सहकार्य करावे.