श्री शंकर महाराज मंदिर (कृपाधाम आश्रम) - टिटवाळा

श्री शंकर महाराज मंदिर (कृपाधाम आश्रम) - टिटवाळाश्री शंकर महाराज मंदिर (कृपाधाम आश्रम) - टिटवाळाश्री शंकर महाराज मंदिर (कृपाधाम आश्रम) - टिटवाळा

श्री शंकर महाराज मंदिर (कृपाधाम आश्रम) - टिटवाळा

श्री शंकर महाराज मंदिर (कृपाधाम आश्रम) - टिटवाळाश्री शंकर महाराज मंदिर (कृपाधाम आश्रम) - टिटवाळाश्री शंकर महाराज मंदिर (कृपाधाम आश्रम) - टिटवाळा
  • श्री शंकर महाराज
  • संस्थेबद्दल
  • उत्सव
  • रुद्राभिषेक नोंदणी
  • देणगी
  • छायाचित्र
  • प्रशस्तिपत्र
  • संपर्क साधा
  • More
    • श्री शंकर महाराज
    • संस्थेबद्दल
    • उत्सव
    • रुद्राभिषेक नोंदणी
    • देणगी
    • छायाचित्र
    • प्रशस्तिपत्र
    • संपर्क साधा
  • श्री शंकर महाराज
  • संस्थेबद्दल
  • उत्सव
  • रुद्राभिषेक नोंदणी
  • देणगी
  • छायाचित्र
  • प्रशस्तिपत्र
  • संपर्क साधा

|| श्री शंकर जय शंकर ||

भक्तवत्सल, योगसिद्ध, ज्ञानरूपी - श्री शंकर महाराज

  

श्री शंकर महाराज - नाथ सिद्ध परंपरेतील तेजस्वी प्रकाशस्तंभ आणि अनंत भक्तांच्या जीवनात दिव्यता आणणारे परिपूर्ण गुरु.श्री महाराज हे केवळ योगी नव्हते, तर कृपा आणि चैतन्याचे साक्षात व्यासपीठ  होते. भक्तांच्या आयुष्यात त्यांची उपस्थिती म्हणजे एक विलक्षण अनुभूती असायची, त्यांच्या कृपेने भक्तगणांच्या आयुष्यातील दुःख, अंधार कायमचा दूर व्हायचा. 


महाराजांच्या जन्माविषयी अनेक गूढ कथा सांगितल्या जातात, ज्यातून त्यांच्या अद्वैत स्वरूपाची आणि विलक्षण आध्यात्मिक सामर्थ्याची झलक दिसते. श्री शंकर महाराजांच्या प्रचलित असलेल्या छायाचित्रा नुसार, महाराजांचे वर्णन ‘अष्टवक्र’ आणि 'अजानुबाहू' होते. त्यांचे मोठे व तेजस्वी डोळे आणि चेहऱ्यावरील लहान मुलासारखे भाव हे सर्वात लक्षणीय होते. ते नेहमी श्री स्वामी समर्थ महाराजांना "गुरुमाऊली" म्हणत आणि सर्व भक्तांना "स्वामींच्या नामात सर्व सामर्थ्य आहे. निष्ठेने, प्रामाणिकपणे उपासना करा", असे सांगत.


महाराजांचे जीवन म्हणजे सततचे भ्रमण, सततची लोककल्याणाची साधना. हिमालयातील समाधीस्थ प्रदेश, नगर–पुण्याची पुण्यभूमी, सोलापूर व नरसोबाची वाडी, माहूरगड, गिरनार अशा अनेक नाथपंथी आणि दत्तपरंपरेच्या स्थळांशी त्यांचा अतूट संबंध आणि जास्त ओढा होता. “साधेपणा” हा त्यांच्या जीवनाचा श्वास - चहा, खिचडी, कांदा भजी आणि हिना अत्तर हे त्यांचे विशेष आवडते. ज्यांनी महाराजांना बाह्य रूपाच्या पलीकडे पाहिले तेच लोक त्यांच्याकडे टिकले व त्यांचे परमभक्त झाले.


महाराजांचे आणखी एक विलक्षण वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे बहुभाषिक सामर्थ्य. भक्त कोणत्याही भाषेत प्रश्न विचारत, महाराज त्याच भाषेत उत्तर देत - यातून त्यांची करुणा, ज्ञानसमृद्धी, त्यांचे प्रकांड पांडित्य, कुशलता आणि सर्वसमावेशकता कळून येते. भाषा बदलत असे, पण त्यांची दृष्टी एकच: भक्ताला समजून घेणे, त्याला उभारी देणे.


सन १९४७, वैशाख शुद्ध अष्टमी - या दिवशी धनकवडी, पुणे येथे महाराजांनी समाधी स्वीकारली. परंतु आजही त्यांच्या अष्टांग योगसिद्धीच्या बळावर भक्तांच्या एका हाकेला धावून येतात. समाधीच्या वेळी त्यांचे वय अंदाजे १५० वर्षे होते, जे त्यांच्या अलौकिक सामर्थ्याची प्रचिती देते.

Copyright © 2025 श्री शंकर महाराज मंदिर टिटवाळा - All Rights Reserved.

Powered by

This website uses cookies.

We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.

Accept

सुरक्षाभिंतीच्या जीर्णोद्धारासाठी तातडीचे साहाय्य/देणगी बाबत

कृपया संपूर्ण मजकूर देणगी विभागात वाचावा आणि सहकार्य करावे.

देणगी